दक्षिण सोलापुरातील लवंगी गावातील देवीची यात्रा करून परत निघालेल्या परिवारावर कर्नाटकात काळाने घाला घातला. कर्नाटकातील हॉस्पेट गावाजवळ भाविकांच्या मोटारीला ट्रकने धडक दिली.
यामध्ये दोन चिमुकल्यांसह सहाजण जागीच ठार झाले. मोटार ट्रकखाली अडकून पडल्यामुळे सर्वांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी लवंगी येथे सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. राघवेंद्र सुभाष कांबळे (वय 25), पत्नी जानू राघवेंद्र कांबळे (वय 23), मुलगा राकेश राघवेंद्र कांबळे (वय 5), मुलगी रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय 2, सर्वजण मूळ रा. लवंगी, ता. दक्षिण सोलापूर. सध्या रा. कर्नाटक) यांच्यासह दोन नातेवाईकांचा अपघातात मृत्यू झाला.
राघवेंद्र कांबळे हे दक्षिण सोलापुरातील लवंगी गावचे रहिवासी होते. गावातील यात्रा करून परत ते बंगळुरू येथे मोटारीने निघाले होते. यावेळी हॉस्पेटगावाजवळ हा अपघात घडला असून, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने लवंगी गावावर शोककळा पसरली आहे. दक्षिण सोलापुरातील लवंगी येथ वास्तव्याला होते.


0 Comments