LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सिंधुताई महादेव माने सेवापूर्ती सन्मान

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(मुली) मरवडे येथील *सहशिक्षिका मा.सौ.सिंधुताई महादेव माने मॅडम* यांच्या शैक्षणिक सेवाकार्य क्षेत्रातील सेवापूर्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी *श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री.बापू* व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे *लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे साहेब* यांच्या हस्ते श्री.विठ्ठल- श्री.संत दामाजी पंत यांची सुबक मूर्ती आणि फुलहार घालून त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करून सेवानिवृत्त जीवन वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

गेली अनेक वर्षे संस्कार साधनेच्या सारस्वत ज्ञानमंदिरामध्ये अध्यापन कार्य कर्तव्याच्या माध्यमातून मा.सौ. माने मॅडम यांनी केलेली विद्यासेवा उल्लेखनीय आणि अभिनंदन पात्र आहे. सामाजिक क्रांतीचे आणि व्यक्ती परिवर्तनाचे प्रभावी साधन असणाऱ्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सेवा खर्ची करुन आपण आपले आयुष्य सार्थ केल्याचे गौरोवउद्गगार आमदार महोदय यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. प्रदीप जी खांडेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) मा.संजय जी जावीर सो, माजी जिल्हा समाजकल्याण मिस्टर सभापती मा. सचिन भाऊ शिवशरण, माजी संचालक मा.विजयदादा माने, मा. लतिफभाई तांबोळी, तालुका गटशिक्षणाधिकारी मा.पी.के. लवटे सो,शिक्षण तज्ञ मा.डॉ.रणदिवे सो, प्राथमिक शिक्षक पतसंस्था जिल्हा संचालक मा.संजय चेळेकर गुरुजी, शिक्षक नेते मा.सुरेश पवार गुरुजी आदी मान्यवर तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments