पंढरपूर प्रतिनिधी -
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पक्षाच्या ध्वजास वंदन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अवताडे यांचे हस्ते महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचे हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष भोसले यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत पुढील काळात पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचलन महादेव अदापुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवकचे जिल्हा सचिव अतुल खरात यांनी मानले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ माॕसाहेब,अहिल्यादेवी होळकर,महात्मा ज्योतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीकांत शिंदे,कृष्णात माळी,बाळासाहेब शेख,उमेश सासवडकर,रणजित पाटील,गिरिष चाकोते,आण्णासाहेब पोपळे,साधना राऊत,संगिता माने,बापू शिंदे,स्वप्निल जगताप,रशिद शेख,सुनिल जाधव,कपिल कदम,अजित थोरात,युवराज भोसले,विशाल सावंत,शुभम पवार,यश महिंगडे,शाम पवार,विश्वजित व्यवहारे,विजय काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments