LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर येथील युवकाचा पंढरपूर येथे अपघाती मृत्यू.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)  पंढरपूर येथील अंबाबाई मंदिर नजिक असणाऱ्या नवीन पुलावर छोटा हाथी टेम्पोमधील पन्हाळी पत्रा गळ्यास लागून चिरल्याने सोलापूर येथील एका युवकाचा बुधवार दि १२ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती अशी पंढरपूर येथील नवीन पुलावर अवेंजर मोटरसायकल  क्र एम एच १२, ए क्यू ९८३वरून सुभेदार मुजावर कय्युम (वय,४८, रा. सौंदने, ता.मोहोळ, आणि आमिन दगडू शेख,( वय ४० , रा. अंबिका नगर, बाळे,सोलापूर) हे दोघेजण मोहोळ वरून पंढरपूर कडे येत असताना अचानक छोटा हाथी टेम्पो थांबल्याने पत्रा गळ्यात घुसल्याने अमीन दगडू शेख याचा जागीच मृत्यू झाला.

मोटार सायकल चालवित असलेले कय्युम मुजावर हे अपघाताचा अंदाज येताच वाकल्याने ते बचावले, पण मागे बसलेले अमीन शेख यांना काय होत आहे, हे कळायच्या आत अपघात झाला.

या प्रकरणी हयगायीने, रस्ता न बघता, निष्काळजी घेऊन वाहन चालविल्याने मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून छोटा हाथी टेम्पो क्र एम एच १३ , डी क्यू ०४९१ याचा चालक सुनील नागनाथ अभंग राव (वय,२६ रा. सोलापूर नाका, पंढरपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधिक् तपास स पो नि सोनकांबळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments