पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील अहिल्या पुलावर ट्रक आणि मोटार सायकल यांच्या अपघातात कोर्टी येथील एका युवकाचा दोन टायर मध्ये सापडून अत्यंत भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती अशी, गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता पंढरपूर येथे मुसळधार पाऊस सुरू होता.
यावेळी एम एच ९ सी यू ५५६४ हा ट्रक पंढरपूर हून टेंभुर्णीकडे वेगात निघाला होता. तर पल्सर मोटारसायकल क्र.एम एच १३ बी एफ ३५०६ वरील दत्तात्रय बाळू वाघमारे (वय,२१ रा. कोर्टी, ता. पंढरपूर) हा युवक पंढरपूर शहराकडे येत होता.
यावेळी अहिल्या पुलावर ट्रक आणि मोटार सायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन दत्तात्रय बाळू वाघमारे हे या अपघातात गंभीर जखमी होऊन दोन टायर मध्ये अडकून पडले.
अपघातानंतर अहिल्या पुलावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
रात्री साडे नऊ च्या सुमारास क्रेन च्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे स पो नि सोनकांबळे आधिक तपास करीत आहेत.
या आठवड्यात पंढरपूर परिसरात अपघाताची मालिका सुरू आहे. रोपळे येथे एका हॉटेल मध्ये क्रुझर जीप घुसून दोघे गंभीर जखमी झाले. कोर्टी येथे दुधाच्या टँकर खाली आल्याने एक दुचाकीस्वार ठार झाला तर भंडी शेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्याने तरुण व होतकरू शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पंढरपूरकडे येणारे सर्व सात रस्ते राज्य महामार्ग दुपदरी झाले आहेत, पण वाढते अपघात रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी केली पाहिजे.


0 Comments