LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

इर्शाळवाडी येथील दरड ग्रस्तांना विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप

(एक हात मदतीचा पुढे करत विठ्ठल प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतला आहे त्याचं कौतुक:- चेअरमन अभिजीत पाटील) 



प्रतिनिधी पंढरपूर/- 

रायगडमधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच मृत पावले आहेत.बुधवारी मध्यरात्रीपासून इर्शाळवाडीत शोध मोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेत जे बचावले आहेत त्यांच्यासाठी एक महिना पुरेल एवढा किराणा मालाचे किट पंढरपुर येथील *विठ्ठल प्रतिष्ठान* च्या माध्यमातून बेस कॅम्प येथे प्रशासनाकडे देण्यात आला आहे.



श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या *विठ्ठल प्रतिष्ठान* ने सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचे किट 100 किट खालापूर तालुक्यातील चौक येथे असणाऱ्या बेस कॅम्प येथे देण्यात आले आहे. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, खाद्यतेल, तूर दाळ, साबण, चहा, टूथपेस्ट, बिस्कीट अश्या वस्तू देण्यात आल्या. खलापूरचे तहसीलदार तांबोळी यांच्याशी संपर्क साधला सर्व वस्तू प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. पंढरपुरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सध्याचे खलापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचीही मदत झाली. मुख्यमंत्र्यांनी आव्हान केल्यानंतर अनेक संस्था मदतीसाठी पुढे आले आहेत. 


:: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद ::

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पंढरपूर येथील विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने इर्शाळवाडी येथील झालेल्या दुर्घटनेत प्राण वाचलेल्या लोकांसाठी एक महिना पुरेल एवढा किराणा मालाचे 100 किट पोहचवले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे सदस्य श्री.शंकर साळुंखे यांनी दिली...

Post a Comment

0 Comments