सन्मित्र ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील विशिष्ट कापड दुकानदारा विरोधात दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
पंढरपूर शहरातील सर्व शाळा व संस्था काही विशिष्ट कापड व स्टेशनरी दुकानाची नोटबुक ,पुस्तक, बूट ,गणवेश करता विद्यार्थ्यांची व पालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करीत आहेत .याबाबत आपणाकडून वरील खाजगी शाळा व संस्थाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी
वरील विषयांवे सन्मित्र ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थे कडे पंढरपूर शहरातील बहुसंख्य पालकांच्या वरील सर्व दुकानदार व शाळाविरुद्ध तक्रारी आल्या आहेत .अंगणवाडी ते 5 वी ते 8 वी गणवेश किंमत 700 ते 900 किंवा 1000 रुपये मध्ये विकले जात आहेत. वरील शाळा व संस्थांनी काही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती? किंवा काही निविदा व टेंडर कापड व स्टेशनरी दुकानदारांनी दिले होते का? याची सखोल चौकशी करण्यात यावी .
विशिष्ट कापड दुकानाची नेमणूक केल्यामुळे गोरगरीब, मागासवर्गीय ,उदरनिर्वाह करून कुटुंब सांभाळणाऱ्या जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे .तरी या गंभीर बाबीचा विचार करून संबंधित सर्व शाळा व संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी .
अन्यथा सन्मित्र ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर्फे आंदोलन, मोर्चा, उपोषण करावे लागेल. या सर्व घटनेला आपण व शिक्षण प्रशासन जबाबदार राहील .
तरी पुनश्च या संबंधित शाळा व संस्था एका विशिष्ट कापड दुकानावरील बेकायदेशीरपणे नेमणूक करत असेल तर त्यांच्याविरुद्ध शिक्षण कायदा 2003 प्रमाणे कारवाई करावी असे निवेदन गटशिक्षणाधिकारी पंढरपूर .न.पा.शिक्षण अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले .
यावेळी उपस्थित सन्मित्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव ,प्रशांत (बाबा)धुमाळ ,सतीश सासवडकर ,अविनाश जक्कल,इस्लाम बागवान,विश्वजीत पवार ,इत्यादी उपस्थित होते


0 Comments