महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा (राज्यमंत्री पद दर्जा ) नियुक्तीनंतर पंढरपूर येथे येऊन भगवान श्रीपांडुरंग व रुक्मिणी माता यांचे आशीर्वाद घेतले .
महाराष्ट्र राज्यात प्रथमच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान शेखर मुंदडा यांना मिळाला आहे.महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गोमांसावर बंदी घालण्यासाठी २०१५ च्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि पशुधनाच्या सर्वांगीण भल्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र गो सेवा स्थापन केला आहे. यां यशा मागे मागील अनेक वर्षे समजासाठी व गो माते बद्दल त्यांनी केलेलं कार्य याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रभरातील अडीच हजार पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे जाळे असणारे महा एनजीओ फेडरेशन व आतापर्यंत हजारो निष्पाप गाईंचे कसयांपासून प्राण वाचवण्यात देखील राज्यात शेखर मुंदडा यांची खूप मोठी भूमिका होती.
महाराष्ट्रातील प्रत्येक गोरक्षक व गोभक्त यासोबतच हजारो देशी गोवंश सांभाळणाऱ्या गोशाळा प्रतिनिधी यांचे प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करणार आहेत.
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचा गौरवपूर्ण उल्लेख मुंदडा यांनी केला. वारकरी पाईक संघ, वारकरी फडकरी संघटन व पंढरपूर मंदिरे समिती यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले व योगेश बजाज मान्यवर उपस्थित होते.


0 Comments