LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीचे संदीप मांडवे यांचेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सुरू



इर्शाळवाडीच्या संकटग्रस्त  लोकांनाही पंढरीतून पोहोचविली अन्नधान्यासह ५० निवारा केंद्राची  मदत

पंढरपूर/प्रतिनीधी

राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आणि लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. याचाच एक भाग म्हणून इर्शाळवाडीच्या संकटग्रस्त  लोकांनाही पंढरीतून पोहोचविली अन्नधान्याची    आणि पॉलीटेन्टची मदत नुकतीच पोहोचविली आहे. यावेळी विधानपरिषद उपसभापती निलमताई गोरे उपस्थित होत्या.

   या मदतीमध्ये रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून जखमी झालेल्या लोकांना पंढरपूर मधून एक मदतीचा हात म्हणून इर्शाळवाडीतील ५० कुटुंबाना एक महिन्याचे किराणा समान  व ५० पाॅलीटेन्ट वाटप करून आपली कायम सुरू असलेली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस आणि संदीप दादा मांडवे मित्र परिवार यांच्यावतीने ही मदत करण्यात आली आहे.यावेळी बुवा सर , चंदन हलगट्टी , तुळजाराम नागेश जाधव , रवी आटपाडकर , सुहास म्हमाणे,विजय मोरे , धीरज देवकते , गणेश जाधव,बापू यादव,पंकज माने , अनिल सोनावणे , तात्या धोत्रे , शुभम कदम , योगेश चौरे राकेश मोरे , मयूर भोसले , राम जाधव स्वप्नील वाघमारे , योगेश कचरे . आदी कार्यकर्ते सोबत उपस्थित होते. 

    संदीप मांडवे यांनी कोणत्याही संकट काळात आपली मदत करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कोरोना कालावधीत भुकेल्याना दररोज अन्नदान, महापूर, दुष्काळ, यासह  कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो. त्याठिकाणी आपला खारीचा वाटा म्हणून मदत देण्याची परंपरा मागील अनेक वर्षापासून त्यांनी जपली आहे. त्यामुळे संदीप मांडवे यांचे नाव चांगलेच परिचित झाले आहे.

Post a Comment

0 Comments