राष्ट्रीय नाभिक युवक संघटना व क्रांतीमित्र सामाजिक संस्थेने केला अनोखा उपक्रम
पंढरपूर-9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मारक पंढरपूर येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. हुतात्मा लाला वाघमारे यांचे पणतू सुनिल वाघमारे, हुतात्मा रघुनाथ शिंदे यांचे वारसदार अरूण शिंदे, स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वाळूजकर यांचे नातू गणेश वाळूजकर, स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ साळुंखे यांचे पुत्र यशवंत साळुंखे, परमेश्वर सुरवसे यांचे पुत्र संजय सुरवसे, स्वातंत्र्यसैनिक भगवान राऊत यांचे नातू अमित राऊत, शहीद रमेश देवकर यांच्या मातोश्री विमल देवकर यांचा राष्ट्रीय नाभिक युवक संघटना, क्रांतीमित्र सामाजिक संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर राष्ट्रीय नाभिक संघटनेचे संस्थापक अरूण जाधव, सरचिटणीस मयूर जाधव, ह.भ.प. बबनकाका शेटे, प्रदेशाध्यक्ष सुधीर गाडेकर, संजय काळे सर, मल्लिनाथ चौधरी, पांडुरंग चौधरी, महिला पोलीस कर्मचारी कुसूमताई क्षिरसागर, पोलीस ज्ञानेश्वर गायकवाड, पोलीस श्रीराम ताटे, सचिन डांगे, सोहम काळे, रामदास काळे, राजू पवार, राजाराम खंडागळे, डॉ.अशोक माने, धनेश डांगे, योगेश जाधव, राहुल सराटे, पांडुरंग डांगे, निलेश राऊत, दत्ता काशिद, निलेश चव्हाण, अभिनंदन वाघमारे आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण, क्रांतीमित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण भांगे, पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ताजी भुसे, जितेंद्र भोसले, मनोज गावटे यांनी केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश भोसले,विजय भोसले, महेश माने, विठ्ठल भोसले, विजय माने, खंडागळे, अभिषेक शेटे,अनिल शेटे, गुलशन जाधव, राकेश देवकर, निलेश शिंदे, महादेव शिंदे, मयूर खंडागळे, कौस्तुभ देवकर, अनुग्रह चव्हाण, परमेश्वर डांगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित खंडागळे यांनी केले तर आभार तुकाराम चव्हाण यांनी मानले.
0 Comments