पंढरपूर- कृषी महाविद्यालय,पुणे येथील १९७३ ते ७७ दरम्यान असणाऱ्या कृषी पदवीधरांचे सातवे स्नेहसंमेलन गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या ‘गेट-टुगेदर’ मध्ये निवृत्त बँक अधिकारी पासून ते पोलीस उपअधीक्षक, आयुक्त पर्यंतचे अनेक अधिकारी आपले अधिकारी पद विसरून तन, मन, धनाने मित्र बनून स्वेरी कॅम्पसमध्ये एकरूप झाले होते.
सोलापूर जिल्हा कृषी वर्गमित्र १९७३ ते ७७ मधील वर्ग मित्रांनी या उपक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. प्रारंभी भजन गीतांच्या मैफिलीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी कृषी महाविद्यालय पुण्यातील १९७३ ते ७७ बॅच मधील पदवीधरांचे स्वागत केले. पांडुरंग कोडग यांनी प्रास्ताविकामध्ये या सातव्या स्नेहसंमेलनाच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रात हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी उडविलेल्या हास्याच्या फवारणीने सर्वजण चिंब भिजले. ‘मैत्रीचे नाते हे रक्ताचे नसले तरी आत्मीयतेने जोपासले जाते’ याचाच प्रत्यय या कृषी पदवीधरांच्या स्नेह संमेलनातून दिसून येत होता. माजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सांगलीचे डॉ.विश्वासराव मोरे यांनी स्वेरीच्या यशस्वी वाटचालीची सविस्तर माहिती देवून आपल्या निर्भेळ वकृत्वाने संमेलनाला उर्जा दिली. मिष्ठांन्न भोजनानंतर एकमेकांचा परिचय, हितगुज, चर्चा, धमाल मनोरंजन, जेष्ठांचा सत्कार, यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वेरीमध्ये एकूणच दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. यावेळी स्वेरीच्या विश्वस्त व गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सौ. प्रेमलता रोंगे, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, यांच्यासह कृषी महाविद्यालय पुण्यातील १९७३ ते ७७ बॅच मधील जवळपास १५० वर्ग मित्र सपत्नीक उपस्थित होते. गेट टुगेदर मुळे संपूर्ण कॅम्पस गाड्यांनी व सेवा निवृत्त अधीक्षक, निवृत्त पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी यांनीच भरला होता. उपस्थितांना संयोजकांच्या वतीने आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सविता दुधभाते यांनी केले तर हणमंतराव भोसले यांनी आभार मानले. उमरसिंह परदेशी, माणिकराव साठे, मोहन रेळेकर, खतीब, ज्ञानेश्वर गायकवाड, नंदकिशोर पुंड, यशवंत सुर्वे, शंकर सुर्वे, हरिदास सुर्वे, यशोधन पाटील, विश्रेक्ष पाटील, आदी निवृत्त अधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments