सोलापूर :-
येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारी ला सर्वांनी लागावे असे आव्हान मनसे चे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. सोलापूर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोन्या मारुती चौक येथील मध्यवर्ती कार्यालय मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर दक्षिण तालुका, या सहा विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
येणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले महाराष्ट्रातील जनता सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच पक्षावर संताप व्यक्त करत असून या कोणत्याही पक्षावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास राहिलेला नाही .महाराष्ट्रातील जनता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्याकडे विश्वासाने बघत असून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षावरच जनतेचा विश्वास राहिला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे राज साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील .सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जो चिखल झालाय ते सर्व पाहून जनता कंटाळी असून फक्त राज साहेब ठाकरे हेच जनतेसाठी महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जनतेचे प्रश्न माननीय राज साहेब ठाकरे यांनी सोडवत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध
भागातील लोक आपापल्या भागातील प्रश्न राज साहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन येतात आणि राज साहेब ठाकरे च त्यांचे प्रश्न सोडवत आहेत,त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने तयारीला लागा असे आव्हान दिलीबापू धोत्रे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभि रंपुरे,उपाध्यक्ष सत्तार सय्यद, महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ, उपजिल्हाध्यक्ष शोभा साठे मंगळवेढा उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, उप तालुकाध्यक्ष देवदत्त पवार, शहराध्यक्ष राजवीर हजारे मोहोळ तालुकाध्यक्ष कैलास खडके, शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपशहर अध्यक्ष प्रदीप प्रचंडे ,अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील, नागेश कुंभार, शिंदे ,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे रोजगार से रोजगार चे जिल्हाध्यक्ष गोविंद बंदपट्टे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे, यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उप तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते..
0 Comments