LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

हुलजंती येथील पंचक्रोशीतील हजारो महिलांनी अभिजीत पाटील यांना बांधली राखी

गेल्या काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांना राखी बांधली होती. रक्षाबंधनानिमित्त अभिजीत पाटलांना मंगळवेढ्यातील हुलजंती येथे हजारों व माता-भगिनीं व बहिणीनी एकत्र येऊन अभिजीत पाटील यांना राखी बांधली..

हुलजंती सरपंच मिनाक्षीताई कुरमुले, सारिका सलगर, शितल बोरकडे, साधना आठवले, स्वाती पेटरे, जिजाबाई बाबर, संध्याराणी बोरकडे, स्वाती बर्डे, सोनाली कुंभार, स्वाती पेट्टरगे, सुमित्रा निगडी, ज्योती सोभुर्ते, कविता मेत्रे आदी महिलांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

अभिजीत पाटील यांनी हुलजंती येथील महालिंगरायाचे दर्शन घेतले.व समस्त हुलजंती पंचक्रोशीतील व देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिजीत पाटील यांचे नागरी स्वागत करून करण्यात आले.

पाटील यांनी  पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात 2024 ची निवडणूकीत उतरणार असल्याने जोरदार तयारी सुरू केली आहे.. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे मंगळवेढा येथील अनेक गाव वाडीवस्तीवर गाव भेट देत आहेत. 

 लहानापासून थोरापर्यंत आणि महीलामध्ये हि आपली माणुसकी जपली होती. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याच धर्तीवर सध्या विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपली लोकप्रियता विविध स्थरातून वाढत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे.

Post a Comment

0 Comments