LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

लाठीहल्याचा मुस्लीम समाजाच्या वतीने तीव्र निषेध

पंढरपूर ( प्रतिनिधी) जालना येथे सराटी या गावी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण कर्ता मराठा समाजातील बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आज पंढरपूर शहर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध राजकीय पक्ष तसेच मराठा बांधव व अन्य सामाजिक संघटना त्याचबरोबर मराठा समाजाच्या कायम पाठीशी असलेला मुस्लिम समाज या मुस्लिम समाजाने आज या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

    यावेळी या निषेध मोर्चामध्ये पंढरपूर येथील मुस्लिम समाजातील मान्यवर व्यापारी उपस्थित होते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले,एडवोकेट इस्माईल कडगे, शफी मुलानी, बशीर शेख, माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद, वसीम शेख,शाखरुख मुलाणी व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

     समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी आपले मत व्यक्त केले आजपर्यंत मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मूक मोर्चा काढला त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार या मराठा समाजाने  घडू दिलेला नव्हता. परंतु आज कित्येक वर्ष झाले मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून या मराठा समाज बांधवांनी जालना येथील सराटी या गावी उपोषण करीत असताना पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाठीहल्ला करून महिला वयोवृद्ध नागरिक तसेच तरुणांना जखमी केलेले आहे या घटनेचा निषेध म्हणून पंढरपूर शहरातील मुस्लिम बांधव तसेच विविध मुस्लिम संघटना या मराठा समाजाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आज या निषेध मोर्चामध्ये सामील झाले होते मराठा समाज हा मुस्लिम बांधवाला मोठ्या भावासारखा आहे. अशा या मराठा बांधवांच्या वर झालेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या निषेध मोर्चात सामील झालो आहोत. असे मनोगत समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी व्यक्त केले.

     पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले

Post a Comment

0 Comments