रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सोनार समाजाचा विचार मंथन बैठकीच पंढरीत आयोजन केल आसल्याची माहीती सर्व शाखीय सोनार समाज संघटन भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बाबुराव बुराडे यांनी दिली असून
रविवार दिनांक २४ रोजी सकाळी आकरा वाजता श्री संत नरहरीमहाराज सोनार चौक महाद्वार येथे
मान्यवर समाज बांधवांचे हस्ते नुतन नामफलकाचे अनावरण होऊन दुपारी बारा वाजता हाॅटेल इन जुन्या एस टी स्टॅन्ड समोर पंढरपूर येथे विचार मंथन बैठक सुरू होईल याच बैठकीत नुतन पदाधिकाऱ्यांना निवड पञ प्रधान करण्यात येणार असून बैठकीत संत नरहरीमहाराज सोनार यांचा प्रचार व प्रसार तळागाळापर्यंत कसा पोहोचवला जाईल या व अधिक विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीस सोनार समाज नेते व भारतीय नरहरी सेनेचे प्रमुख मार्गदर्शक मा आ. रवींद्रजी मिर्लेकर. श्री सुधाकर आण्णा टाक धानोरकर या सह महाराष्ट्रातून मान्यवर सर्व शाखीय सोनार समाज बांधव उपस्थित राहणार आसल्याचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बाबुराव बुराडे. यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.....
0 Comments