पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिवस जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
पंढरपूर मध्ये मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ईद मिलाद उन-नबी म्हणून साजरा करण्यात येतो. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्त्व आहे.ईद मिलाद उन नबीच्या दिवशी घरं आणी धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाई केली जाते व प्रार्थना केली जाते.यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
ईद मिलाद निमित्त मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी केले जातात, तसेच शहरातील मक्का मस्जिद येथून मिरवणूक अर्थात, जुलूस काढण्यात येतो.
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येतो. सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात येते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. या सणाला ‘ईदों की ईद’ असेही म्हटले जाते.
ईद-ए-मिलादनिमित्त समाजातील वंचित, गरीब लोकांना मिठाई, कपडे व धान्यवाटप केले जाते.मुलींना शिकवा, अहिंसा अंगी बाणवा आदी सामाजिक संदेश दिले जातात. हे येथील जुलूसचे खास वैशिष्ट्य ठरते. मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवनात समानता, सौहार्द, शांतीचा संदेश दिला. हाच संदेश जनमानसात रुजावा यासाठी मौलाना आपल्या भाषणातून उपदेश करतात.इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते.
इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते.
नवीन कपडे घालून, नमाज अदा करून आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण व खाऊ वाटप करून ईद-ए-मिलाद साजरा करतात.
सध्या ईद-ए-मिलादनिमित्त पंढरपूर शहरात उत्साहाचे वातावरण असून पोलिस व नगरपलिका यंत्रणादेखील सज्ज झाल्या आहेत.
पंढरपूरमधील मुस्लिम बांधवांनी यावेळी वेगवेगळ्या स्वरूपात लहान मुलांना खाऊ वाटप करन्यात आले.यावेळी हिंन्दु बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्या दिल्या.यावेळी जुलुस कमीटीचे अध्यक्ष गौस धारुरकर,समाजसेवक मुजम्मील कमलीवाले,हा.खलील कमलीवाले,खाटीक समाजाचे अध्यक्ष जब्बार वस्ताद,महंमद वस्ताद,शफी मुलाणी,ॲड कडगे,शाहरुख मुलाणी,बशीर शेख, दानीश कमलीवाले उपस्थित होते.


0 Comments