पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरालगत असलेल्या वाखरी प्लाॅट एरिया येथिल आनंता बाबूराव कैकाडी माने यांच्या व त्यांच्या परिवारातील मुलगा आणि बहिण यांच्या नावे असलेल्या गट नंबर ४१७ मधिल जवळपास ५२ एकर इतक्या शेतजमिनीचा व्यवहार छोरिया प्राॅप्रर्टीज ॲन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार बिल्डर कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्याशी झाला होता परंतु जैन यांनी आपली व आपल्या परिवाराची दोन वेगवेगळ्या प्रकारचे सही शिक्के असलेले विक्रीपञ अस्तित्वात आणून फसवणूक केल्याचा आरोप करित कैकाडी माने यांनी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे कन्हैयालाल देवीचंद जैन याच्या विरुद्ध बनावट दस्त केल्या कारणाने फौजदारी प्रकारचा शासणाच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची दाद मागीतली असल्याने ५२ एकर संबंधित बिल्डर छोरिया व या ठिकाणी प्लॉट घेतलेल्या प्लाॅट धारकांचे ढाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे


0 Comments