शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये या दळभद्री सरकारच्या बोल घेवड्या पोकळ योजनांचा भांडाफोड व चिरफाड करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून राहुल चव्हाण पाटील (माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक), उपजिल्हा प्रमुख .सुधीरभाऊ अभंगराव, शहर प्रमुख .रविंद्र मुळे* यांच्या मार्गदर्शनाखाली व पंढरपूर शहर अभियान प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरातील श्री संत नामदेव पायरी, महाद्वार येथे *"होऊ द्या चर्चा "* कार्यक्रम पार पडला.
एकंदरीत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या बद्दल सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, मजदूर युवक यांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष निर्माण झालेला आहे गावागावात उद्धव साहेबांबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण होत आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर उपशहर प्रमुख विनय वनारे, उपशहर प्रमुख तानाजी मोरे, शहर संघटक सचिन बंदपट्टे, शहर कार्याध्यक्ष अनिल कसबे, युवासेना जिल्हा समन्वयक फिरोज तांबोळी, युवासेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, युवासेना उपतालुका प्रमुख प्रणीत पवार, अतुल शितोळे, हैदर शेख, राहुल धोत्रे, गुरुदेव अष्टेकर, संदीप कसबे, महेश खरात, सौरव चौगुले, पिंटू गायकवाड, स्वप्नील गावडे, मारु बंदपट्टे, तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत बहुसंख्येने इतर लोक उपस्थित होते.


0 Comments