LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वाखरीत सर्व प्रकारचे अवैद्य धंदे खुलेआम

 पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय 



पंढरपूर (प्रतिनिधी)

राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर  शहरानजीक असलेल्या पालखी महामार्गावरील वाखरी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व अवैद्य धंदे राजरोस असे दिवसरात्र सुरू असुन त्यावर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन उपनिरीक्षक यांचे स्पष्टपणे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे जे सर्वसामान्य नागरिकांना हे पालखी महामार्गालगत असलेले दोन नंबरचे धंदे उघड उघड चालु असल्याचे दिसुन येत आहे ते पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना का दिसत नसावेत असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे त्यामुळे याची गंभीर अशी दखल घेऊन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीच याबाबत या अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे अवैद्य दारू जुगार मटका गुटखा नियम डावलून चालवले जाणारे परमिटरूम बियर शाॅपी हाॅटेल लाॅज व लाईनच्या नावाखाली चाललेला वेश्याव्यवसाय हे सर्व धंदे खुलेआमपणे सुरू असताना पोलीसमाञ बघ्याची भुमिका घेत आहेत असे दिसून येत आहे तर येथिल काही नागरिकांच्या मते हे चालणारे धंदे पोलीसांना माहित असूनही ते यावर जाणीवपूर्वक कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे

Post a Comment

0 Comments