पंढरपूर. दिनांक 27[प्रतिनिधी]
आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी एकलव्य सेनेचे अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी धुळे ते मुंबई पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्या पद यात्रेला सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले आहे.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक पंढरपूर येथे सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन प्रशासन व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच आदिवासी विभागाच्या 25 आमदार आणि चार खासदारांनी आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या 33 जमातीचे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन हे सर्व खोटे आदिवासी आहेत असा छोटा प्रचार करून प्रांताधिकारी व जात प्रमाणपत्र पडताळणीचे अधिकारी यांच्यावरती दबाव टाकून जात प्रमाणपत्र मिळू देत नाहीत व मिळालेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला हाताशी धरून अवैद्य करतात व घटनेच्या कलम 342 नुसार महादेव कोळी, मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती पासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. त्या विरोधात संघर्ष पदयात्रा धूळे ते मुंबई येथे 28 रोजी मंत्रालया वर जात आहे या संघर्ष पद यात्रेला सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो व राज्य शासनाने याच्यात हस्तक्षेप करून अन्यायग्रस्त 33 अनुसूचित जमातीच्या लोकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे यावेळी गणेश अंकुशराव लक्ष्मण धनवडे विश्राम कोताळकर पांडुरंग सावतराव सोमनाथ कोरे अमोल तावसकर जयवंत अंभगराव महेश माने आरविद नाईकवाडी गणेश कोळी संपत सर्जे दशरथ करकमकर अनिल कांबळे सुरज कांबळे अमोल नेहतराव प्रकाश मगर गणेश घाटे माऊली भाऊ कोळी नवनाथ शिंदे आप्पा करकमकर विक्रम परचंडे सोमनाथ भादुले कुणाल अधटराव पांडुरंग कोळी व असंख्य आदिवासी महादेव कोळी बांधव उपस्थित होते


0 Comments