LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार कार्तिकी एकादशीची महापूजा!

 पंढरपूर प्रतिनिधी

कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त शासकीय पूजा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त निर्भीडच्या हाती आले असून मागील काही दिवस महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने यातील कोणाच्या हस्ते ही शासकीय महापूजा होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता त्यावर पडदा पडला असून अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मानाची पूजा होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असतानाच मराठा समाजातील नेत्यांना संबंधित समाजाने व आंदोलकांनी गाव बंदी केली होती तर विविध प्रकारे सरकारला पेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता यावर सरकारने काही दिवसाची मुदत घेतली असून यावर काहीतरी तोडगा निघेल असे सरकारचे म्हणणे आहे दरम्यान याच काळात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक येतात एकादशीची शासकीय महापूजा ही नियमाने राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केली जाते मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

त्यावर तूर्तास तरी मुदत घेतल्यामुळे आंदोलक शांत आहेत तर आज पंढरपूर येथील कार्तिकी यात्रे एकादशीची मानाची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Post a Comment

0 Comments