पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार की पंढरपूर मंगळवेढा असा प्रश्न उपस्थित होत आहे माञ ते विधानसभा निवडणुक नक्की लढवणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जिंकल्यानंतर अभिजीत पाटील यांनी कारखान्यावरील शेतकरी मेळाव्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटही होता त्या शेतकरी मेळाव्यास संबोधित करत असताना शरद पवार यांनी स्व.माजी आ.भारत भालके यांच्या निधनानंतर या मतदार संघात एकूण पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी अभिजीत पाटील यांनी भरून काढली असल्याने बोलत पवार यांनी अभिजीत पाटील हे महाविकास आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आगामी उमेदवार असतील असे स्पष्टपणे संकेत दिले होते परंतु काही दिवसातच अजित पवार यांच्या फारकती नंतर माढा तालुक्याचे आ.बबन शिंदे हे अजित पवार यांच्या गटाबरोबर गेले त्यामुळे आ.शिंदेना शह देण्यासाठी शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना माढा मतदारसंघातुन निवडणुक लढवण्यासाठी तयारी करण्याच्या सुचना दिल्याची खाञीलायक माहिती मिळत आहे याचे राजकीय गणित असे की अभिजीत पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली तर याचा अचूक असा फायदा हा भाजपा उमेदवारासच होणार असल्याचे बोलले जात आहे तर जातीय समिकरण पहाता विद्यमान आमदार समाधान आवताडे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके ज्यांचा गत निवडणुकीमध्ये निसटता पराभव झाला होता त्यांनीही स्पष्ट केलेच आहे की कोणत्याही परिस्थितीत भालके परिवारातील सदस्य पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुक लढवणार त्यामुळे अभिजीत पाटील यांनीही हीच विधानसभा निवडणुक लढवल्यास त्या ठिकाणी मतांचे विभाजन होऊन त्याचा अचूक असा फायदा हा भाजपा उमेदवारासच होणार असल्याचे दिसून येत आहे की ज्या भाजपास शरद पवार हे स्वता तीव्र राजकीय विरोध करत आहेत तर ज्या माढा विधानसभा मतदारसंघामधून सलग ६ वेळा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी मधून विजयी झालेले व आमदार असलेले बबन शिंदे हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटाबरोबर गेले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे त्याचबरोबर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील ४२ गाव व माळशिरस तालुक्यातील १६ गाव आहेत तर पंढरपूर तालुक्यातील करकंब, रोपळे, भोसे, शेगाव दुमाला अशी मोठी मतदार संख्या असलेली गावे माढा मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत स्वतः अभिजीत पाटील यांचेही गाव माढा मतदारसंघामध्ये येत असून माढा मतदारसंघातील अनेक गावे ही करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत तसेच या माढा मतदार संघामध्ये पंढरपूर तालुक्यातील असलेल्या ४२ गावांमध्येच मोठ्या प्रमाणावर विठ्ठल परिवार आहे तर या मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील जोडले गेलेल्या १६ गावांवर मोहिते-पाटील गटाचे मोठ्याप्रमाणावर वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे व मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातील राजकीय मतभेद हे सर्वश्रुत आहेत त्याच बरोबर या ठिकाणावरील ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल त्या पक्षास माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासही अधिक मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.


0 Comments