पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर ते पैठण पालखी मार्गावरील व्होळे - कौठाळी येथील भीमा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे बसविण्यात यावे आशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे यांनी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी उप अभियंता मेटकरी साहेब, शाखा अभियंता घाडगे साहेब यांना निवेदाद्वारे केली आहे, गेल्या चार वर्षांपासून ह्या पुलाचे संरक्षण कठडे भीमा नदीला पूर आल्या मुळे काढून ठेवले आहेत, ते अद्याप पर्यंत बसविण्यात आले नाहीत, सद्या साखर कारखाना गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतुकीची वाहने ह्याच पुलावरुन मोठ्या प्रमाणत जात, येत आहेत त्यामुळे चालत जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे, त्यामुळे प्रशासन एखद्या नागरिकचा जीव जाण्याची वाट पाहत आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे, तरी प्रशासनाने तत्काळ पुलाचे सरक्षण कठडे बसवून होणारे अपघात टाळावे, अन्यथा 11 डिसेंबर पासुन बांधकाम विभाग कार्यालय पंढरपूर येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे आनंद लोंढे यांनी सांगितले आहे या वेळी निवेदन देताना प्रशांत राऊत, शरीफ शेख, सचिन बाभळे, समाधान सोनवले, आरिफ शेख, महेश सोनवले, प्रभाकर कुलकर्णी, आदिंसह स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments