पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांनी पंढरपूर शहरातील नागरिकांची व मालमत्ता धारकांची भरमसाठ केलेली करवाढ याचा पंढरपूर शहरातील जनतेतून तीव्र विरोध होत असून त्यासाठी नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात करवाढ रद्द करावी यासाठी नगर परिषदेच्या विरोधात सह्यांची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली ही मोहीम पंढरपूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने श्री अभिजीत आबा पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी सहकारी साखर कारखाना वेणूनगर,गुरसाळे ता.पंढरपूर यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या विरोधात पंढरपूरच्या जनतेत असलेला रोष शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा लोकशाही मार्ग अवलंबण्यात येत आहे.


0 Comments