आकाश नवनाथ शिंदे मामासाहेब जगदाळे जनता विद्यालय येडशी बोर्डिंग येथील हा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला होस्टेलवर खूप त्रास झाला बोर्डिंग वर नाही गरम पाणी नाही सतत मारहाण निकृष्ट दर्जाचे अन्न व लाईटची सोय नाही वारंवार जाचाला कंटाळून तिथल्या शिक्षकांना कंटाळून विद्यार्थ्यांना कंटाळून त्या विद्यार्थ्याने चंद्रभागेचे वाळवंट गाठले तो आकाश आमच्या आदिवासी महादेव कोळी बांधव कुणाल आदटराव या युवकाला आढळला त्याची सखोल चौकशी करून महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्याशी संपर्क साधला आम्ही त्याची सखोल चौकशी करून त्या विद्यार्थ्याला पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार आहोत शासनाने या विद्यार्थ्यांची दखल नाही घेतली त्या बोर्डिंग वर कारवाई नाही केली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने देतो यावेळी गणेश अंकुशराव कुणाल अधटराव.सचिन अंभगराव उपस्थित होते


0 Comments