पारंपारिक पद्धतीने वेशभूषा धारण केलेल्या मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
पंढरपूर(प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने आणि वेशभूषेत महिला भगिनी आणि युवक तरुणांसह मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, बावडाचे उद्योजक काशिनाथ अनपट,
यांच्या प्रमुख उपस्थित तर कॉन्ट्रॅक्टर सुहास वसंतराव शिर्के संभाजी संपत्ती आसबे, अॅड. पराग भानुदास जागीरदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सिंहगर्जना ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात विविध प्रकारच्या पारंपारिक वेशभूषेत तरुण मुली ,युवक, हे अश्वावर विराजमान झाले होते. तर त्याच्या पाठीमागे पारंपारिक पद्धतीच्या सनई चौघडा, लेझीम खेळ, शिवकालीन पोशाखामध्ये महिला पुरुष मोठ्या उत्साहात सहभागी होऊन थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. सदरची मिरवणूक ही तांबट धर्मशाळेपासून चौफळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, भोसले चौक, नाथ चौक ते पुन्हा गांधी रोड वरून तांबट धर्मशाळा येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे काढलेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले होते. जय भवानी जय शिवराय च्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. अगदी शांततेत कोणताही गोंधळ न करता ही मिरवणूक निघाल्याने पोलीस प्रशासनाने ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांचे आभार मानले. जयंतीच्या ठिकाणी मिरवणूक पोहोचल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना आणि पंढरीत आलेल्या भाविकांना प्रसाद आणि केळीचे वाटप करण्यात आले.
सदर पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी अ.भा. मराठा महासंघाचे महिला जिल्हा अध्यक्षा सौ. प्रभावतीताई गायकवाड, तालुकाध्यक्षा सौ.रतनताई थोरवत, सह सौ. राधीकाताई चव्हाण, सौ.ज्योतीताई शिंदे, सौ.अर्चनाताई चव्हाण,
अॅड. प्राजक्ताताई शिंदे, सौ. रंजनाताई जाधव, सौ. अश्विनीताई साळुंखे, डॉ.संगिताताई पाटील, सौ.विजयाताई खामकर,
सौ. सुजाताताई मलपे,सौ. छायाताई आगलावे, सौ. कोमलताई देशमुख, सौ.लोळगेताई यांनी परिश्रम घेतले. तर मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष शामराव साळुंखे,उपाध्यक्ष सचिन थिटे,सचिव मिलिंद काळे, खजिनदार सचिन गंगथडे मिरवणूक प्रमुख गणेश कदम, संघटक विकास गणेश,मार्गदर्शक सतिश धनवे सर, नाईकनवरे सर, इंद्रजित गोरे,प्रदिप मोरे,तात्यासो देशमुख, नागेश रितूंड, शकील मुलानी, महादेव कवडे, नागेश कोरके, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमान कदम, युवक जिल्हाध्यक्ष शिवाजी मोरे,
सह विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा नियोजन समिती व मराठा महासंघा तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
0 Comments