LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर : उशिरा आलेले शहाणपण...!

 भगीरथ भालके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


पंढरपूर प्रतिनिधी : - स्वर्गीय भारत नाना भालके यांनी प्रथमच पंढरपुरातील राजकारणात आपल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रवेश केला तर लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याचे त्यांनी मनापासून प्रयत्न केले हे प्रयत्न जनतेच्या डोळ्यासमोर होत असल्याने भालके यांनी आलेल्या प्रत्येक माणसाला कधीही रिकाम्या हाताने माघारी पाठवले नव्हते. तरी याच कामाच्या माध्यमातून आपल्या संपर्क कार्यालयातच राजकीय दरबार भरवला होता. शहर व तालुक्यातील जनता मोठ्या अपेक्षेने या कार्यालयात कसल्याही प्रकारचे आपले कामे भालके यांच्याकडे घेऊन जात होते तर आमदार भारत भालके स्वतः जनतेचे कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष घालत होते त्यामुळेच भारत भालके यांची पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुक्यात गरिबांचा वाली अशी ओळख निर्माण झाली होती.

भालके यांच्या याच कार्यामुळे पंढरपूर शहर व मंगळवेढा शहर तालुक्यातील जनता भारत भालके यांच्यावर प्रेम करत होती मात्र कालांतराने स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या निधनानंतर भारत भालके यांचा दरबार बंद झाला त्यांच्यावर प्रेम करणारी पंढरपूर मंगळवेढ्यातील जनता अक्षरशः पोरकी झाली दरम्यानच्या काळात पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक संकटे अशा कार्यकर्त्यांवर येऊन गेली यावेळी भारत नाना भालके यांच्या मागे भगीरथ भालके यांनी त्यांची जागा भरून काढावी अशी अपेक्षा असताना भगीरथ भालके मात्र कित्येक दिवस पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून गायब झाले असल्याचे दिसून येत होते. 

 जनतेला भारत नाना भालके सारखा पाठीराखा हवा असताना भगीरथ भालके मात्र यावेळी नव्हते.... त्यामुळे भारत भालके यांच्यावर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांच्यापासून दूर गेली... आता पुन्हा एकदा... भगीरथ भालके राजकारणात सक्रिय झाले असून पंढरपूर येथील भक्तिमार्ग परिसरात त्यांनी आपले संपर्क कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भारत भालके यांच्या जयंतीचे निमित्ताचे औचित्य साधून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. 

भगीरथ भालके यांच्याकडून पंढरपुरातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत मात्र मागील काही दिवसांच्या त्यांच्या वागण्यातून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते सपशेल फेल ठरले आहेत. तसेच मागील काही काळात भगीरथ भालके यांचा आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी बऱ्याच नेत्यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात आपली कुवत तपासण्याचा प्रयत्न  केले असल्याचेही दिसून आले. हे भालके यांना न समजण्याइतपत ते नादान नाहीत असे आम्हास वाटते त्यामुळे आता या कार्यालयात भारत भालके यांच्या कार्याप्रमाणे जनतेसाठी काम केले जाते का नाही हे आता येणारा काळच ठरवेल तर भगीरथ भालके यांनी स्वर्गीय भारत नाना भालके यांची कार्यपद्धती सुरू ठेवली तर दूर गेलेली जनता पुन्हा एकदा त्यांच्याजवळ येण्यास कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळेच या प्रसंगाला उशिरा आलेले शहाणपण असेच म्हणावे लागेल.

Post a Comment

0 Comments