LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सण उत्सव,तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबावित राहण्यासाठी फलटण शहर पोलीसांचा रूट मार्च,

 


 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा)  प्रतिनिधी. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहे. तसेच येणारे सण उत्सव आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन देखील चांगलेच सज्ज झाले असुन. याच अनुषंगाने  फलटण शहर पोलिसांनी फलटण शहरांतून रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्यासह फलटण विभागातील पोलीस अधिकारी आणि आदीं कर्मचाऱ्यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता. सदर  रूट मार्च हा फलटण शहर पोलीस ठाण्यापासून ते जबरेश्वर मंदिर - श्रीराम मंदिर -टोपी चौक -बादशाही मस्जिद -पाचबात्ती चौक -रविवार पेठ -आखरी रस्ता- कुरेशी नगर- कुरेशी मशिद -नायरा पेट्रोल पंप- बारामती फुल -सोमवार पेठ -मंगळवार पेठ -बारामती चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- फलटण बस स्थानक या मार्गाने पुन्हा पोलीस ठाण्याकडे वळवण्यात आला.

Post a Comment

0 Comments