LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भव्य रक्तदान शिबीर व आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न..

 अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,थोर मराठा कै‌ आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त  भव्य रक्तदान शिबीर व आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न..

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक थोर मराठा कै‌ आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४२व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंहगर्जना ग्रुप पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले मराठ्यांसाठी मार्गदर्शीका ठरणारे "आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजीराव काळुंगे सर उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार समाधान दादा आवताडे,मा आमदार प्रशांत मालक परिचारक,मा जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख,मा नगराध्यक्ष नागेश काका भोसले, किरण आप्पा भोसले,डॉ मंदार सोनवणे, दत्तात्रय काळे,शंकर सुरवसे, नितीन करंडे,भास्कर जगताप, संदिप पाटील, विश्वजीत भोसले, गणेश जाधव, सोपानकाका देशमुख,तानाजी मोरे,धनराज लटके,सागर चव्हाण,स्वप्नील गायकवाड, माऊली काळे,निलेश कोरके, आकाश पवार हे उपस्थित होते.प्रास्तावीक अर्जुनराव चव्हाण व सुत्र संचालन विक्रम बिस्किटे सर यांनी केले‌.यावेळी शिवाजी मोरे, सचिन गंगथडे,संतोष जाधव,अमोल पवार,सतिश धनवे सर,गुरुदास गुटाळ,शामराव साळुंखे,नागेश गायकवाड,काका यादव, हणमंत कदम,रोहित चव्हाण, पांडुरंग शिंदे,सचिन थिटे,गणेश काळे,नागेश कोरके,अमर शिंदे, दिगंबर खपाले,संतोष घाडगे, विलास बागल,शहाजी बागल,विजय बागल,आण्णा मलपे,विलास देठे सर,औदुंबर डीसले,नाना शिंदे,अभिजित शिंदे,शिवम जाधव,विनायक पडवळे,अजिनाथ कदम,राजेंद्र चव्हाण, सतिश शिंदे,अमर सुरवसे,ॲड प्राजक्ताताई शिंदे,प्रभावतीताई गायकवाड, अश्विनीताई साळुंखे,डॉ संगीताताई पाटील,नाईकनवरे ताई यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments