संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धारपुडी गावचे सुपुत्र शहीद जवान सुभेदार रोहिदास दादासो फडतरे यांना मध्यप्रदेश मध्ये देशसेवा बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले होते. या घटनेची माहिती खटाव तालुक्यांसह धारपुडी ग्रामस्थांना आणि कुटुंबांना समजल्यानंतर सुभेदार रोहिदास फडतरे यांच्या निधनामुळे धारपुडी गावासह परिसरांत शोककळा पसरली. शहीद जवान सुभेदार रोहिदास फडतरे यांचे पार्थिंव आज त्यांच्या मूळ गावी दाखल झाल्यानंतर धारपुडी गावातील ग्रामस्थांनी सजवलेल्या वाहनांतून त्यांची गावातून भारत माता की जय अमर रहे अमर रहे! रोहिदास फडतरे अमर रहे! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर शासकीय मानवंदना देवुन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी खटाव तालुक्यांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच पोलीस अधिकारी आणि लष्करी विभागातील अधिकारी वर्गांनी पुष्पचक्र वाहून अंतदर्शन घेतले, सुभेदार रोहिदास फडतरे यांची पार्थिंव पाहताच कुटुंबियाचा एकच आक्रोंश उडाला होता. सुभेदार रोहिदास फडतरे यांच्या पश्चांत आई-वडील पत्नी आणि मुलगा मुलगी भाऊ भावजय असा त्यांचा परिवार होता.


0 Comments