संभाजी पुरीगोसावी (जालना जिल्हा) प्रतिनिधी. सदर बाजार पोलीस ठाण्याचा मागील काही दिवसांपूर्वी नव्याने पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या वाहन चोर बारीक सारी चोऱ्या माऱ्या तसेच अवैध धंदे व्यवसायिकांचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे हे चांगलेच सतर्क आहे. याच अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने दोन संशयित इसम हे धारदार तलवारीची विक्री करण्याकरिता येणार असल्यांची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पोलीस ठाण्यातील डी.बी पथकांच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी निवांत हॉटेल समोर एका ऑटो रिक्षा मधील दोन संशयित आणि त्यांच्याजवळ मुद्देमालाबाबत तपासणी केली असता सदर दोन संशयिताकडे धारदार तलवारी आढळून आल्या. यामध्ये आणखीन तीन तलवारी त्या संशयितांना कडे आढळून आल्या पोलिसांनी मोटार वाहनासह दोन्ही आरोपींना ताब्यांत घेतले, सदर दोन्ही आरोपींच्या कब्जांतून मोटार वाहनासह सुमारे जवळपास एकुण ९,५५, ३००/ रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नेपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे महिला पोलीस उपनि.दिपाली शिंदे पोलीस पो.कॉ. धनाजी कावळे रामप्रसाद रंगे दिवाशिश वर्मा अमर पोहार यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांकडूंन विशेष कौतुक होत आहे.


0 Comments