LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अंकलीत १४ लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंकलीत १४ लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला, सांगली ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, 

संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंकली (ता. मिरज ) येथे उभारलेल्या पोलिसांच्या तपासणी नाक्यावर तब्बल १४ लाखांचा विनापरवाना रित्या गुटखा तसेच त्याची वाहतूक करणारी पिकअप जीप असा जवळपास एकूण २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सांगली ग्रामीण पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून. एक जण फरार असल्यांची माहिती सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे. असलम सलीम मुजावर ( वय ३५ रा. विनायकनगर, सांगली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. तर इरशाद मुलाणी (रा. खोजा कॉलनी सांगली) असे फरार असल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे,दारू गुटखा यासह अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी तपासणी नाका उभे केले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांचा अंकली येथे तपासणी नाका आहे. यावेळी मिरजहुन आपली फाटामार्गे एक पिकअप जीप (एमएच ५०. ७२२९ ) सांगलीकडे निघाली होती. तपासणी नाक्यावरील पोलिसांना सदर गाडीचा संशय आल्याने गाडी अडवण्यात आली. सदर पिकअपची झडती घेतली असता. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये भरलेला विविध कंपन्याचा गुटखा, सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बाबर मॅडम नितीन बाबर ईस्लाम तांबोळी रमेश पाटील हिम्मत शेख सतीश सातपुते आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments