दरोडा टाकून पवनचक्कीच्या कॉपर वायरची चोरी करुन फरार झालेल्या आरोपींच्या उंब्रज पोलिसांनी आवळल्या मुसक्या... उंब्रज पोलिसांची कामगिरी,
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. उंब्रज जांभेकरवाडी ता. पाटण गावच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी पवनचक्कीच्या कॉपर वायरची चोरी करुन आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला उंब्रज पोलिसांनी गजाआड केले होते. या प्रकरणात एका फरार आरोपींच्या शोधात उंब्रज पोलीस होते. अखेर उंब्रज पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेवुन त्याची सखोल चौकशी करुन विचारपूस केली असता. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. उंब्रज पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रमेश किसन मोरे (वय ३५ रा. मराठावाडी ता. पाटण जि. सातारा ) असे आरोपींचे नाव आहे. सदर आरोपींने आपल्या साथीदारांसह पवनचक्कीचे कॉपर वायरची चोरी केली होती. यामध्ये जवळपास १,४०,००० रुपये किंमतीची पवनचक्कीच्या कॉपर वायरचे चोरी करीत असताना कुऱ्हाडीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यामध्ये चार आरोपींना जागीच पकडण्यात आले होते तर सदर आरोपीं नामे रमेश किसन मोरे हा सदर ठिकाणाहून पळून गेला होता. वरिष्ठांच्या आदेशावरुन अखेर आरोपींस पकडण्यात उंब्रज पोलिसांना यश मिळाले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र मोरे पो.उपनि. श्वेता पाटील पो.उनि.रमेश ठाणेकर पो.हवा. सचिन जगताप पो. हवा. संजय धुमाळ पो.कॉ. मयूर थोरात पो.कॉ. राजकुमार कोळी पो.कॉ. श्रीधर माने पो. कॉ. निलेश पवार पो. कॉ. प्रशांत पवार पो.कॉ. प्रफुल्ल पोतेकर आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


0 Comments