LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निवडणुकीत व्हाट्सअप ग्रुप वरील पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमीन जबाबदार

  


संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. तुमचा एखादा व्हाट्सअप ग्रुप असेल किंवा त्या व्हाट्सअप ग्रुपला आपण ग्रुपचे ॲडमीन असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या काळात व्हाट्सअप पोस्टमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप सदस्यासह अँडमीन जबाबदार धरले जाणार आहे. तसेच त्यानुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते याबाबत संभाजी पुरीगोसावी यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम नुकताच जाहीर केला असून. त्यानुसार पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात परिषद प्रशासनाकडूंन पत्रकार परिषद घेवुन निवडणुकीच्या बाबत सूचना देण्यात येत आहेत. यात निवडणूक काळात व्हाट्सअप ग्रुपवरील पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदस्यासह अँडमीन देखील जबाबदार असल्यांचे पुरीगोसावी यांनी सांगितले आहे. यामध्ये जाणीवपूर्वक खोटी बनावट माहिती व्हिडिओ फोटो मजकूर सोशल मीडिया द्वारे पसरवणे, जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेला बांधा आणण्याचा प्रयत्न करणे, धार्मिंक जातीय तेढ निर्माण करणे, याबाबतचे प्रयत्न रोखण्यासाठी व त्यावर कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील पोस्ट इ.ची दखल घेवुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल तसेच व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमीनने अशा माहितीच्या प्रसाराबाबत खातरजमा केली पाहिजे, त्यातून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदस्यांसह ग्रुप ॲडमीन जबाबदार धरले जाईल असे प्रतिपादन पुरीगोसावी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments