लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री .दगडू कांबळे -- प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज चे संपादक व सोशल मीडिया संघटना खजिनदार -- महाराष्ट्र राज्य तसेच त्यांचे चिरंजीव प्रथमेश कांबळे हे उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या असते प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुलांनी अगदी ढोल ताशाच्या गजरात केले.स्वागत गीत व भीम गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी अंधशाळेतील विद्यार्थिनी कु. सुवर्णा गायकवाड हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दगडू कांबळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधशाळेचे मुख्याध्यापक संतोष बारहाते सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - महेश म्हेत्रे सर यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचे आभार अंधशाळेचे विद्यार्थी यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने अंधशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार अमोल अभंगराव यांनी दिले व मिष्ठांना भोजन देण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमासाठी अंधशाळे तील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments