LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

 

*संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे - प्रणिती शिंदे*

काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे, आम्ही ते होऊ देणार नाही. बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत. शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी विचारासाठी लढत राहू, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. आज चौदा एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले. यानंतर सुशीलकुमार शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी यावेळी पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो. मी ज्या-ज्या वेळी सोलापूरला असतो, त्यावेळी येथे येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करतो. त्यानंतर कामाला सुरुवात करतो. बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक पाया रचणारे थोर नेते आहेत. 

अमेरिकेमध्ये जसे अब्राहम लिंकन आहेत, तसेच बाबासाहेब आमच्या देशाचे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत. त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावी, अशी भूमिका या देशाची आहे. पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचे काम चालू केले आहे. तसे आम्ही ते कधीही होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले आहे. 

*संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे - प्रणिती शिंदे*

संविधान बदलण्याची भाषणे सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जे संविधानविरोधी आहेत, त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून चळवळ सुरू केली पाहिजे, असे आवाहन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, एकंदरीतच सोलापुरात सध्या शेतकऱ्यांचा विषय तीव्र झालेला आहे. आज जीएसटीचा विषय आहे, दुधाला दर नाही आणि पाणी नाही, हे सर्व असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे, तो दिसून येत आहे. हे विषय सोडवण्यासाठी जे जे काही लागेल ते सर्व काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे, तसेच जाहीरनाम्यात महिलांबाबत शेतकऱ्यांबाबत, युवकांबाबत चांगल्या योजना आहेत. जीएसटी रद्द करण्याचा विषय असेल असे अनेक चांगले विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घेण्यात आल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.

यावेळी माननीय श्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, संजय हेमगड्डी, सुरेश हसापुरे, विनोद भोसले, प्रमिला तूपलवंडे, गणेश डोंगरे, बाबा करगोळे, सुशीला आंबुटे, मधुकर आठवले, रॉकी बंगाळे, नागनाथ कदम, भोजराज पवार, नरसिंह असोदे, देवेंद्र भंडारे, अनिल मस्के, बसवराज म्हेत्रे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, श्रीकांत दासरी, नागेश म्हेत्रे, लखन गायकवाड, तिरुपती परकीपंडला, परशुराम सतारेवाले, अंबादास गुत्तीकोंडा, सुहास जाधव, बालाजी जाधव, अनुपम शहा, सुभाष वाघमारे नागनाथ शहाणे, उमेश सुरते, लखन गायकवाड, संजय गायकवाड सुरेश पाटोळे धीरज खंदारे चंद्रकांत हिवसे, संघमित्रा चौधरी, हेमा चिंचोळकर चंदा काळे शुभांगी लिंगराज, बिराजदार, मिरा घटकांबळे, शंकर नरोटे पृथ्वीराज नरोटे, गौतम मसलखांब, बापू घुले, पंडित गणेशकर, व्यंकटेश भंडारे, हाजी शेख, अभिलाष, मोहसीन फुलारी बालाजी जाधव ,विवेक इंगळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments