संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. दिवाळी असो, किंवा कोणताही उत्सव पोलीस मात्र कायम रस्त्यावर उभे असतात एकही सण,उत्सव त्यांना आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही अहोरात्र ते आपल्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी उभे असतात त्यांना कोणताच सण उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी एखादा निर्णय घ्यायला हवा असे व्यक्तिगतरित्या वाटत आहे. सन 2017 पासून सातारा जिल्ह्यासह बाहेरील आणि संपूर्ण महाराष्ट्रांतील पोलीस प्रशासनामुळे मी माझ्या नावाचा ठसा उमटवला आहे. पोलीस प्रशासनाकडूंन मला नेहमीच सहकार्य आणि प्रेम आपुलकी जिव्हाळा मिळाला त्यामुळे मला पोलिसांबद्दल नेहमीच अभिमान वाटतो, पोलीस खात्यातील सीनियर अधिकारी असून सुद्धा तसेच सर्वच वरिष्ठ आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडूंन नेहमीच पुरीगोसावी दादा तर पुरीगोसावी सर असा आवाज आमच्या मनात भरला गेला आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडूंन आमच्या कामाबद्दल देखील नेहमीच कौतुकाची थाप असते, पोलीस हा सरकारचा कर्मचारी असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्या सोपवलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचा अधिकार त्यांना आहे पोलिसांमुळे आपण आज सुरक्षित आहोत. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत असा कोणी नसेल की ज्याने पोलीस हा शब्द ऐकला नसेल, पोलिसांचे नाव आणि काम आपल्या सर्वांनाच माहित आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा शोध करणे आणि गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही पोलिसांची मुख्य कामे आहेत. शिवाय गुन्हे टाळणे गुन्हेगारांवर खटले भरणे कैद्यांना तसेच सरकारी तिजोरी खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेची संरक्षणाची जबाबदारी पोलीसच करतात. या व्यतिरिक्त सामाजिक आर्थिंक विविधता कार्यान्वित करण्यासाठी सुध्दा पोलीसांना कामगिरी बजावावी लागते. त्यामुळे महाराष्ट्रांतील तमाम जनतेने पोलिसांचा नेहमीच आदर राखला पाहिजे, पोलीस रस्त्यावर उभे असतील तर आपण त्यांना जयहिंद सर असे म्हणा खरंच आपल्याबद्दल देखील पोलीसांना खूप आधार वाटेल, आपल्या अडचणीच्या संकटाच्या काळात, आपल्या जवळचे देखील धावून येत नाहीत पण महाराष्ट्र पोलीस नेहमीच आपल्या सेवेत असतात, हे मात्र कधीही विसरुन जाऊ नका,_


0 Comments