LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आई,भाऊ,मामाच्या मारहाणीत तरुणी ठार तिघांना अटक: तरुणीचा प्रियकरासोबत लग्न करण्याचा होता आग्रह

संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. प्रेमीयुगुलाने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४ रा. शनिवार पेठ कोल्हापूर) हिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत मृत तरुणीची आई शुभांगी(वय ५०) भाऊ सुरज (वय २०) आणि मामा संतोष बबन आडसुळे (वय ३५ सध्या रा. देवठाणे ता. पन्हाळा मूळ रा. इचलकरंजी ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून खाजगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी पोवार ही आई आणि लहान भाऊ यांच्यासमवेत राहत होती. नऊ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधंन झाले होते. तिचे ओळखीतील एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयाचाही याला पाठिंबा होता मात्र लग्न न करता दोघे एकत्र राहण्याचा विचार करीत होते. लग्न तरी करा किंवा प्रेमसंबंध तोडा, असा आग्रह वैष्णवीच्या आईने धरला होता. त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पोवार या बुधवारी मुलगी वैष्णवी मुलगा सुरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेवुन कात्रज येथे गेल्या तेथे त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला मात्र दोघेही लग्न न करता एकत्र राहण्यावर चांगलेच ठाम होते. त्यामुळे चिडलेल्या शुभांगी मुलगा मुलगी आणि भावाला घेवुन परत आल्या ते चौघेही थेट देवठाणे ता. पन्हाळा येथे संतोष अडसूळ यांच्या घरी गेले, तिघांनी काठी दोरी आणि लोखंडी सळीने वैष्णवीला बेदम मारहाण केली. जवळपास ही मारहाण तासभर सुरू होती. रात्री दोनच्या सुमारांस सर्वजण जेवण करून झोपी गेले होते. काही वेळाने वैष्णवीच्या पोटात दुखू लागले पहाटेच्या सुमारांस तिला खाजगी रुग्णालयात घेवुन गेले, मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने उपचारापूर्वींच तिचा मृत्यू झाल्यांचे डॉक्टरांनी स्पष्ट केले,

Post a Comment

0 Comments