लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर... ६ हजार ५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: पोलीस अधीक्षक समीर शेख
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यात सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठीची आचारसंहिता लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी सुमारे ६ हजार ५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून. परवानाप्राप्त ३ हजार २२८ अग्निशस्त्रापैकी १ हजार ९६२ अग्निशाख पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात संवेदनशील 18 शेत्र असून. प्रत्यक्ष या मार्गावर पोलिसांनी रूट मार्च केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख पुढे म्हणाले... सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. काही महत्त्वांच्या प्रक्रियेला पोलिसांनी सुरुवात केली आहे. १३९७ फरार आरोपींपैकी १३२४ आरोपींचा शोध सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ५५ आरोपींना शोधण्यात यश आले आहे. २०२४ मध्ये १०९७ अजमीन वॉरंट मंजूर झाला असून.४९७ वॉरंट बजावण्याचे काम सुरू आहे मतदारांना दारू पैसे भेटवस्तू इतर अनुषंगिक कारवायांच्या संदर्भात सातारा पोलीस कारवाई करीत आहेत. यामध्ये ३३८६० रुपयांची रोकड पाच हजार ३१ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात २४ लाख ८८ हजार ५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ६०५० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर १६ ठिकाणी चेक पोस्ट भरवण्यात आले असून तेथेही सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी एक बीएसएफ एक सीआरपीएफ तसेच एक होमगार्डची तुकडी जादा तैनात करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे.


0 Comments