LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वंचितचे उमेदवार गायकवाड यांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय योग्यच

वंचितचे उमेदवार गायकवाड यांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय योग्यच; संविधानवादी दलित संघटनांनी मानले आभार

वंचितचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय योग्यच;.... राहुल गायकवाड यांच्या निर्णयाचे सोलापुरातील संविधानवादी दलित संघटनांनी मानले आभार... निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांचे होणारे विभाजन टाळले जाणार ..

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.  त्यांच्या या निर्णयाचे सोलापुरातील संविधानवादी दलित संघटनांकडून स्वागत करत आभार मानले जात आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत आणली होती. मात्र गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे दलित मतांचे विभाजन होऊन भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. त्यातच भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधानामध्ये बदल होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे  मतदारसंघातील संविधानवादी दलित संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात होती. 

दरम्यान, सोमवारी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सोलापुरातील या निवडणुकीत दलित मतांचे होणारे विभाजन टाळता येणार आहे. तसेच येत्या काळात संविधान विरोधी शक्तींना बहुमताने निवडून येण्यास जे पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यास आता प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे. यामुळेच सोलापूर लोकसभा मतदार संघातील कपिल तरुण मंडळ सारख्या संविधान बचाव चळवळीच्या संघटनांकडून राहुल गायकवाड यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.

दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वीच संविधानाच्या बचावासाठी आपण उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांचे होणारे विभाजन टाळले जाणार असून संविधान विरोधी  शक्तींना कमकुवत करून संविधान वाचवण्याची चळवळीला एक प्रकारे बळ मिळणार असल्याची भावना  संघटनेचे पदाधिकारी पंकज मचाले यांनी व्यक्त केली आहे. वंचित आणि एमआयएमच्या या निर्णयामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी दुरंगी लढत होणार आहे.

Post a Comment

0 Comments