आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गावभेट दौऱ्यात कुरघोट गावाला भेट दिली. ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या उत्साहात आणि उस्फुर्तपणे स्वागत केले. भाजप फक्त फसवे आश्वासन देतं. मागील १० वर्षात भाजपने शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची घोर फसवणूक केली. आता ते पुन्हा आपल्याकडे आश्वासन घेऊन आले आहेत. त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. यावेळेस काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन यावेळी केलं. महाविकास आघाडीला गावागावातून मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. यंदा मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास विजय साकार करून देईल, याबाबत शंकाच नाही. याप्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments