सर्कलवाडीत गोळीबारची खोटी माहिती: वाठार पोलीसांत गुन्हा दाखल मध्यवर्तीं नियंत्रण कक्षातून कर्मचारी तात्काळ दाखल,
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पोलीस यंत्रणा देखील कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यामध्ये गुंतली आहे. अशातच वाठार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आणि कोरेगांव तालुक्यांच्या शेवटचे टोक असलेल्या सर्कलवाडीत गावात गोळीबार झाल्याची खोटी माहिती राज्य पोलीस दलाच्या ११२ हेल्पलाइन ला कॉल करुन दिली होती. या प्रकरणी परप्रांतीय युवकांच्या विरोधात वाठार पोलीस स्टेशनला शनिवारी रात्री पावणे दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजेश कुमार (वय १८ रा. नंदलाली ता. सत्तरकटे जि. बिहार सध्या रा. सर्कलवाडी ता. कोरेगांव ) असे या संशयित आरोपींचे नाव आहे. रणजेश कुणार हा सर्कलवाडीतील अरविंद साहेबराव ननावरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करतो शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारांस त्याने पोलीस दलाच्या डायल ११२ या क्रमांकावर सर्कलवाडीमध्ये गोळीबार झाला असल्यांचे सांगितले यावेळी नियंत्रण कक्षातून तात्काळ वाठार पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती देण्यात आली होती. संबंधित घटना ही गंभीर स्वरूपाची असल्यांने वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अशोकराव हुलगे हे आपल्या कर्मचाऱ्यासह तात्काळ सर्कलवाडी दाखल झाले, यावेळी स्थानिक आणि पोलीस पाटील व ग्रामस्थांकडे पोलिसांनी चौकशी केली असता. सदर ठिकाणी असा कोणताच प्रकार घडला नसल्यांचे समोर आले, पोलीस अंमलदार राहुल अभंग यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपींवर कलम १८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


0 Comments