नांदेडचा नायगांव तालुका हळहळला, पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने काही तासांत संपवले आयुष्य, अडीच वर्षाच्या चिमुकलीला भाकरीचा संघर्ष
संभाजी पुरीगोसावी (नांदेड जिल्हा) प्रतिनिधी. पतीचे अपघातात निधंन झाल्याचे ऐकताच धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना नांदेडच्या नायगांव तालुक्यांत घडली आहे. या घटनेमुळे परिसरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. स्नेहल अरविंद बेद्रीकर असे या आत्महत्या केलेल्या पत्नींचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून अरविंद उर्फ अरुण बाबुराव बेद्रीकर (वय ३२) हे वीज वितरण कंपनीत नांदेड येथे नोकरीस होते. आपली ड्युटी संपल्यानंतर शनिवारी आपल्या गावी दुचाकीवरून येत असताना कहाळा-गडगा रस्त्यावर मांजरम गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली जखमीला नांदेडला नेत असताना वाटेतच अरविंद चा मृत्यू झाला. अरविंद यांच्या कुटुंबाला ही माहिती समजल्यानंतर कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला, कुटुंब शेजारी गावकरी नांदेडला पोहोचले मृत्यूची बातमी पत्नीला समजली. यावेळी तिला घरच्यांनी आणि शेजारच्या मंडळींसह गावी बेंद्रीला पाठवले होते. घरी आल्यानंतर सगळी मंडळी दुःखांच्या घटनेत बुडालेले दिसले, त्याच रात्री स्नेहल ने गळफास घेवुन आपले देखील जीवन संपवले, या दोन्ही घटनेतील मयत पती-पत्नीचे नांदेड नायगांव येथे शिवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता शोकाकुल वातावरणात एकाच चिंतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, मयताच्या पश्चांत दोन वर्षाची आदिती नावाची चिमुकली मुलगी आहे.


0 Comments