संभाजी पुरीगोसावी (पिंपोडे बुद्रुक) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांतील पिंपोडे बुद्रुक येथे श्रीराम नवमी या जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने (वर्ष 75 वे) अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन पिंपोडे ग्रामस्थ आणि श्रीराम देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. आज दिनांक १३/०४/२०२४ शनिवार विनोदाचे बादशहा आपल्या वाणीने श्रोत्यांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर गिरी महाराजांचे सुव्याव असे कीर्तन संपन्न झाले, कीर्तनकार ह.भ.प.मधुकर गिरी महाराजांचे पिंपोडे बुद्रुक येथे आगमन होताच पुरीगोसावी कुटुंबाच्या वतीने आणि श्रीराम नवमी देवस्थानच्या सर्व सदस्य कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी पिंपोडे बुद्रुक श्रीराम मंदिर समितीचे सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सध्या सोशल मीडियावर ह.भ. प. मधुकर गिरी महाराज यांच्या कीर्तनाचे अनेक भाग दाखवले जातात, महाराजांच्या विनोदाचार्य या त्यांच्या वाणीतून श्रोत्यांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर गिरी सोलापूरकर महाराजांच्या कीर्तनाचा आनंद पिंपोडे प्रंचकोशीतील आणि परिसरांतील माता बहिणी वय वृद्ध त्या अगदी लहान थोर तरुणांनी देखील कीर्तनकार मधुकर गिरी महाराजांच्या कीर्तनाचा आनंद घेतला,


0 Comments