संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी ( सातारा जिल्हा ) कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमिंत्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर करंजखोप गावातील ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त करताना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलित स्त्रिया गोरगरीब यांच्यासाठी केलेल्या कार्याबाबत उपस्थितांना अगवत केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला संविधान देण्याबाबतचे अमूल्य कार्य त्यांनी केलेल्या संघर्ष व त्यातून मिळवलेले यश आत्ताच्या तरुणाईला कसे प्रेरणादायी आहे. यावर्षीच्या जयंतीनिमिंत्त भव्य मिरवणूक भीमगीतांचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करीत करंजखोप गावातून शांतमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अशोकराव हुलगे यांनी वाठार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


0 Comments