बेकायदेशीर देंशी विदेशी दारु वाहतूक करताना एक जण करवीर पोलीसांच्या ताब्यांत, करवीर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगिरी,
संभाजी पुरीगोसावी ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबेवाडी गावच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारू बाटल्या व मारुती इको कार असा एकूण ५ लाख 70 हजार रुपये 210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात करवीर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पांडुरंग धोंडीराम पांडेकर (वय ५८) रा. पाटील गल्ली निवडे घोरावडे ता. पन्हाळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान रत्नागिरी रोडवर वडगणे फाटा येथे आल्यानंतर स.पो.नि. जालिंदर जाधव यांना मिळालेल्या माहिंतीच्या आधारे कोल्हापूर ते कुर्ली रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या इको कार क्रमांक एम.एच ५० ईजी १७६६ मधून अवैध्य देंशी विदेशी दारूची वाहतूक होणार असल्यांची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी आंबेवाडी येथील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला होता. यावेळी संशयित गाडी जात असताना पोलिसांनी ती गाडी अडवली, गाडीची तपासणी केली असता गाडीत वेगवेगळ्या कंपनीच्या देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळून आला. बिगर परवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या दृष्टीने आणलेल्या दारूचा बाटल्यासह मुद्देमाल करवीर पोलिसांनी हस्तगत केला आहे.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर सुजय दावणे विजय कळसकर रणजीत पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण योगेश शिंदे अमित जाधव विजय पाटील धनाजी बारगे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


0 Comments