LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मानलेल्या बहिणीला पैसे देण्याकरिता पाठवलेल्या मित्रासह सामूहिक केला बलात्कार

मानलेल्या बहिणीला पैसे देण्याकरिता पाठवलेल्या मित्रासह सामूहिक केला बलात्कार, पाच तासांत मुख्य आरोपींच्या एमआयडीसी सिंडको पोलीसांनी आवळल्या मुसक्या,


 

संभाजी पुरीगोसावी (छ. संभाजीनगर ) प्रतिनिधी. मानलेल्या बहिणीला दोन हजार रुपये देण्यासाठी पाठवलेल्या मित्रानेच आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसह सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी एमआयडीसी सिंडको पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरुन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होताच पाच तासांत सिंडको एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकनाथ केदारे असे मुख्य आरोपींचे नाव आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरुन पीडितेने ५ एप्रिल ला सायंकाळी मानलेल्या भावाकडे दोन हजार रुपयाची मागणी केली होती. यावेळी दोन हजार रुपये घेवुन तुमच्याकडे माझा मित्र येत आहे. असे सांगून त्याला मी पैसे दिले आहेत. यावेळी एकनाथ केदारे यांनी तुम्हांला पैसे देतो तुम्ही माझ्यासोबत चला असे एकनाथ ने पीडितेला सांगितले यावेळी पीडिता त्याच्या दुचाकीवर बसून कॉब्रिज चौकात पोहोचली असता, तेथे अन्य दोघांनी पीडितेला झाडांमध्ये ओढत नेत बलात्कार केला तसेच तिचे मंगळसूत्र व मोबाईलही नेला अत्याचार झाल्यानंतर पीडिता रडतच रस्त्यावर आली.यावेळी नागरिकांनी विचारपूस केले असता मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, अखेर एका दुचाकीस्वरांने त्यांना पिसादेवी चौकात आणून सोडले तिथून पीडिता घरी पोचल्यावर दुसऱ्या दिवशी एमआयडीसी सिंडको पोलीस ठाण्यात धाव घेवुन गुन्हा दाखल केला,

Post a Comment

0 Comments