LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजवावा



संभाजी पुरीगोसावी.( सातारा जिल्हा ) सध्या सर्वत्रिक २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण पोलीस महसूल प्रशासन देखील सज्ज झाले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडूंन उपाययोजना राबविण्यात येत आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्र भयमुक्त शांततापूर्ण निवडणुका पार पाडाव्यात यासाठी पोलीस अन् महसूल प्रशासन देखील सज्ज झाले आहे. आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील लोकशाही मजबूत बनवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे. म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे महसूल आणि पोलीस प्रशासनातील धडाकेबाज पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी नुकतेच सांगितले आहे. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणेच होय, कारण मतदान करणे सुद्धा एक देशसेवाचाच भाग आहे. त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क आवश्य बजावणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments