LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नेकनूर पोलीस ठाण्याचे कारभारी लयं भारी, स.पो.नि. चंद्रकांत गोसावी यांची जनतेतून प्रतिक्रिया,

 


 संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा) प्रतिनिधी. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासनात ओळख आहे‌. त्यांनी आत्तापर्यंत नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात देखील उत्कृंष्ट सेवा केली. त्यानंतर त्यांची बीड जिल्हा पोलीस दलात बदली झाल्यानंतर त्यांनी बीड जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा केली.अंमळनेर पोलीस ठाण्यानंतर त्यांची नेकनूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचा पदभार त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेकनूर चौसाळा अशा भागात अवैध धंदे वाढल्याच्या चर्चा नागरिकांतून होत्या. यावेळी स्वतः स.पो.नि. चंद्रकांत गोसावी यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा सक्त इशारा त्यांनी देताच...नेकनूर  चौसाळा परिसरांत आता अवैध धंदे व्यवसायिकांचे धांबे चांगलेच दणाणले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आगामी येणाऱ्या सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देखील नेकनूर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च करण्यात आला. स.पो.नि. चंद्रकांत गोसावी यांच्यामुळे कारवाईमुळे नेकनूर चौसाळा या परिसरांतील अवैध धंदे व्यवसायिकांचे धांबे दणाणले आहेत. त्यामुळे स.पो.नि. चंद्रकांत गोसावी यांची जनतेतून कारभारी लयं भारी अशा आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment

0 Comments