आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धार्मिंक सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चौसाला,नेकनूर परिसरांत स.पो.नि. चंदकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च
संभाजी पुरीगोसावी ( बीड जिल्हा) प्रतिनिधी. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी बीड जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्याच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच येणाऱ्या धार्मिंक सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडूंन रूट मार्च काढण्यात येत आहेत. याच अनुषंगाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये,चौसाला नेकनूर परिसरांमध्ये नेकनूर पोलिसांनी रूट मार्च काढला, या रूट मार्चमध्ये नेकनूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यासह बीएसएफ जवानांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता. सदरचा रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना नेकनूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि.चंद्रकांत गोसावी पीएसआय रोकडे, पोलीस उपनिरीक्षक पान-पाटील यांच्यासह नेकनूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला,


0 Comments